रविवार, २७ मार्च, २०१६

Koli Mahasaangh

प्रधानमंत्री   मुद्रा योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करणार--रमेश दादा पाटील अध्यक्ष कोळी महासंघ.

👍
     कोळी महासंघाचे अध्यक्ष रामेशदादा पाटील यांनी महाराष्टरतील 30000 महिलांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यामातून रोजगार मिळवून देण्याचा संकल्प केला आहे. महाराष्ट्रातील कोळी समाजाची गरीबी कोळी महासंघ या संघटनेचे अध्यक्ष म्हणून महाराषट्रात दौरे करीत असताना जवळून पहिली असल्याने त्यांच्यासाठी काही तरी विकासात्मक कार्य आपण केले पाहिजे असा संकल्प रमेश दादा यांनी केला, केलेला संकल्प तडीस नेण्याची खासियत असलेले व्यक्तीमत्व रमेश दादा यांनी त्यांच्या ओळखीचा व एक उद्योजक म्हणून पंजाब नॅशनल बँकेशी असलेल्या व्यावसायिक संबंधाचा उपयोग गोरगरीब जनतेसाठी करायचा निश्चय केला. त्या दृष्टिकोनातून त्यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या संकल्पना सांगितल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या मुद्रा योजनेसारख्या योजनेतून सामूहिक रित्या स्वयंरोजगार महिलांना दिला तर त्यांचे सक्षमीकरण आपण करू शकतो. त्यांच्या कुटंबस आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यात हातभार लागेलं असे सामाजिक कार्य करण्याचा माझा संकल्प आहे.
तेंव्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले कि साहेब आपण यात पडू नका? व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार करता हे अशक्य आहे? असे सांगितले .योजना अनेक आहेत पण दिलेले कर्ज परत करीत नाहीत.
बचत गट आणि सामूहिक व्यवसायना दिलेली कर्जे तर परत मिळत नाहीत आणि असे हजारो उद्योग बंद पडले आहेत. त्यांना कोलॅटरल सेक्युरिटी कोण देणार 100 महिला एकत्रित राहणार का तयार केलीली उत्पादने कसी विकणार ... अश्या अनेक समस्या आहेत. हे शक्य नाही असे सांगितले. या वर जर मी योग्य उपाय व प्रकल्प दिला तर तुम्ही मला मदत करणार का ?असा प्रतिप्रश्न दादांनी केला तुम्ही प्रकल्प आणा बघू असे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले ,
त्यांनतर दादा नि अनेक लोकांशी विचारवंताशी चर्चा करून एक योजना तयार केली आणि ती बँकेच्या अधिकाऱ्यांच्या समोर मांडली , 

योजना अशी कि प्रधानमंत्री मुदा योजने च्य। माध्यमांतून एका तालुक्यातील 100 महिलांचा एक समूह करून त्यांच्या माध्यमातून पापड लोणचे आणि तत्सम पदार्थ तयार करून घ्यायचे त्यांच्या विक्री ची व्यवस्था कर्ज परतफेडीची हमी आणि त्यांना त्यांचे कामाचे मोल देण्याची जबाबदारी आर एन पी 3s कोळी महासंघाने घेतली आहे ,,, अशाप्रकारे महाराष्ट्रातील 300 तालुक्यातील 30000 महिलांना कोळी महासंघ व आर एन पी 3s व पी एन बी बँके च्या माध्यमातून रोजगार देऊन महिलांचे सक्षमीकरण करण्याचा संकल्प रमेशदादा पाटील यांनी घेतला आहे आणि त्याची सुरुवात 26- 3- 2016 रोजी सकाळी 10 वा. पंजाब नॅशनल बँकेच्या एम. डी. उषा अनंतसुब्रह्ममण्यम मॅडम
व कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्या उपस्थितीत फाईन आर्ट ओडिटोरियम चेम्बुर मोनोरेल स्टेशन जवळ मुंबई येथे करण्यात आला माहिती ऍड. चेतन दादा पटिल यांनी दिली आहे.

koli Mahasangh

प्रधानमंत्री   मुद्रा योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करणार--रमेश दादा पाटील अध्यक्ष कोळी महासंघ.👍

शुक्रवार, १५ जानेवारी, २०१६

     रमेशदादा पाटील कोळी समाजाचे नेतृत्व 

रमेशदादा पाटील( अध्यक्ष महाराष्ट्र राज्य- कोळी महासंघ ) ! एक खडतर, तरीही “यशस्वी” प्रवास
माणूस कोठे पोहोचला, या पेक्षा तो कोठुन कोठे पोहोचला यावरून त्याला यशस्वी ठरविले पाहिजे, असे कोण्या एका विचारवंताने म्हटले आहे. राजाचा मुलगा जन्मताच राजपुत्र बनतो., नंतर तो राजा बनतो. एखादा दिल्लीस एका तासात पोहोचतो कारण तो जवळच आग्र्याला रहात असतो. परंतु अत्यंत हलाख्याच्या परिस्थीतीत जन्म घेणारा जेंव्हा कोळी समाजाच्या विकासाची वाट चालू लागतो, तेव्हा तो दिल्लीत पोहोचला की नाही या पेक्षा आता तो कोठे पोहोचला, यावरून त्याच्या यश-अपयशाचे मोजमाप केले जावे. वरील म्हणण्याचा तोच मतितार्थ आहे.रमेशदादा पाटील यांचा जन्म अत्यंत हलाख्याच्या परिस्थीतीत गरीब, कोळी कुटूंबात झाला. गावी, तालुक्याच्या गावी, जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण झाले.सध्या ऊद्योगपती म्हणुन त्यांची ओळख. चांगली नोकरी व ऊद्योग करुन सुखाचा संसार थाटण्याचे सोडून समाजकारणासाठी - सुलभ भावनेचा त्याग करुन समाजाचा संसार थाटण्याचा निर्धार रमेशदादा पाटील व चेतनदादा पाटील कुटुंबीय करीत आहेत. देवा – समाजा समोर तशी शपथ घेतली व समाजाचा विकास करण्याचा वीङा घेतला. आणि एका खडतर प्रवासाचा आरंभ गेले कीत्येक वर्षापूर्वीपासुन सुरु केला. आणि आजही ती वाट रमेशदादा पाटील व कुटुंबीय त्याच उत्साहाने चालत आहेत.
मुंबई आंदोलनाचा तो दिवस मला अजूनही काल घडल्या सारखा आठवतो. आझाद मैदान येथे कोळी महासंघ’ तर्फे आयोजित केले गेलेले ऐतीहासीक "देता की जाता" आंदोलन राजसत्ता बदलणारे ठरले.याचे साक्षीदार तुम्ही-आम्ही व राज्याचे सद्याचे मंत्रीमहोदय ठरलेत. मी स्वतःमंत्रालयामध्ये नेहमी असतो समाजाचा नेता असावा तर रमेशदादा पाटील यांसारखाच... मंत्रालयामध्ये कधीच स्वतःच्या कामासाठी दादा व चेतनसर आले नाहीत.तर सतत समाजाचा प्रश्न घेऊनच येत असतात.मी ईतर कोणत्याच समाजाचे असे नेतृत्व पाहीलेले नाही.अनेक मंत्री महोदयांसोबत मी बसतो त्यावेळी दादां बद्दल अनेक वेळा मंत्री महोदयांकङुन ऐकलेय की, हे स्वतःसाठी काहीच मागत नाहीत.जे काही मागायचे ते माझ्या समाजासाठीच ...खरच तळमळीचा नेता असावा तर रमेशदादा पाटील सारखाच.. मला नेहमी दादांचे वाक्य आठवते की,आण्णासाहेब आपण कोळी समाजात जन्माला आलोय..समाजाचे आपण देणे लागतो..मला परमेश्वराने काही कमी केले नाही.आता जे काही करायचे ते समाज उन्नती करीताच... रमेशदादा पाटील यांचा प्रवास रमेशदादा पाटील यांच्या चळवळीबद्दल, विचाराबद्दल तसेच त्यांच्या कार्यशैली व स्वभावाबद्दल बोलण्यासारखे – लिहिण्यासारखे माझ्याकडे बरेच काही आहे. रमेशदादा पाटील एक महासागर आहेत. त्यातून एक घागर काढून समोर ठेवली तरी संपूर्ण रमेशदादा पाटील समजू शकतात.
रमेशदादा पाटील अजुन आमदार – खासदार मंत्री बनले नाहीत, तरीही समाजाचे अनेक प्रश्न शासन दरबारी वारंवार मांङुन न्याय मीळऊन देणारे समाजातील एकमेव नेतृत्व ठरले. “समाजासाठी“च ज्यांनी जिवन सर्वस्वाचा त्याग केला, त्या रमेशदादा पाटील यांच्या मागे सच्चे मावळे असल्याचा अभिमान वाटतो.
शिकला – नोकरी केली - बंगला बांधला, पैसा कमावला, चांगला संसार केला, यात वैयक्तिक यश नक्कीच आहे. डॉक्टर, वकील, इंजिनीयर, प्राध्यापक, मोठे अधिकारी बनलात, यातही वैयक्तिक यश नक्कीच आहे. एनजीओ काढली - शाळा बांधली - संस्था उभारल्या, यातही यश नक्कीच आहे. प्रस्थापित राजकीय पक्षातुन आमदार – खासदार – मंत्री बनलात, यातही यश नक्कीच आहे. परंतु राज्यातील ‘सर्वात मोठी तिजोरी मुंबई ’ आणि ‘सर्वात मोठी पाॅवर’ ज्या ठिकाणी आहे, अशा “संसद भवन – दिल्ली” ला ‘लक्ष्य’ करुन “कोळी महासंघ” निर्माण करण्यापर्यंत वाटचाल करणे, यात खुप मोठे यश आहे.
महाराष्ट्रातच नवहे तर विविध राज्यात रमेशदादा पाटील यांना मानणारा, कोठे छोटा – कोठे मोठा वर्ग तयार झाला आहे. जगज्जेत्या सिकंदर’ला युद्धात हरलेला राजा पौरस म्हणतो, ‘ एका राजाने दुसर्या राजाला जशी वागणुक द्यावी, तशी मला वागणुक हवी.’ रमेशदादा पाटील यांची समाजाला प्रजा ते राजापद, बनविण्याची अशी वाटचाल चालू आहे. कोंबडा आरवला नाही तरी, सूर्य उगवायचा थांबत नाही. तद्वत येथील समाजांनी म्हणावी तेवढी दखल घेतली नसली तरी रमेशदादा पाटील नावाचा सूर्य उगवायचा थांबला नाही व थांबणार नाही.
रमेशदादा पाटील आज कोळी समाजात एक नंबरवर आहेत. महाराष्ट्रातच समाजात एक नंबरवर आहेत. नेत्रुत्वाच्या तुलनेत रमेशदादा पाटील यांच्या आसपास ही महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात कोणी कोळी नेता मला दिसत नाही. प्रस्थापित संघटनेतील काही नेते आपले आणि आपल्या समाजाचे स्थान शोधत असताना रमेशदादा पाटील यांनी आपला कोळी महासंघ स्थापन करुन केवळ कोळीच नव्हे तर तमाम उपेक्षित, दुर्लक्षित, दलित, मागास “ समाजा” साठी आदर्श निर्माण केले आहे.
समाजाला राष्ट्रीय समाजाचा प्रमुख राजकीय सत्ता नसतानाही अशक्य वाटावे असे ध्येय, त्यांनी उराशी बाळगले आहे. न थकता, मोठया चिकाटीने त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न रमेशदादा पाटील करीत आहेत. का, कसे, कोणी, असे-तसे प्रश्न विचारत असताना त्यांच्या या वाटचालीत थोडा वाटा उचलू शकलो तर रमेशदादा पाटील यांना आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणे सहज शक्य आहे.
आधुनिक युगातील महा-भारताचे चक्रव्युह भेदु पहाणार्या या नव अभिमन्युला साथ देऊयात, एवढीच कळकळीची विनंती आहे. राज-पुत्र ते राजा असा रमेशदादा पाटील यांचा प्रवास नसून तो सामान्य कुटुंब ते समाज भुषण असा आहे. यामुळे रमेशदादा पाटील यांच्याशी
तुलनाच होवू शकत नाही. रमेशदादा पाटील हे एकमेव “रमेशदादा पाटील” आहेत. त्या सम फक्त तेच आहेत, दूसरा कोणी नाही.
मा.रमेशदादा पाटील आपल्या इप्सित ध्येयाप्रत लवकरात लवकर पोहोचो, हीच त्यांना मनपूर्वक शुभेच्छा ! व सलाम 👏🏻
आपला -
मा.आण्णासाहेब कोळी
प्रदेश सदस्य महाराष्ट्र राज्य- कोळी महासंघ
हिंगणी (म्हसवङ) ता.माण जि.सातारा
🙏 जय वाल्मिकी
🙏 जय एकवीरादेवी
🙏 जय तानाजी
🙏 जय मल्हार
BY------सतीश धडे 
                        संपादक 
                         मासिक कोळी समाज संदेश......